Ad will apear here
Next
वरीच्या तांदळाची खांडवी
वरीच्या तांदळाची खांडवी

सर्वसाधारणतः उपवासाच्या पदार्थांची यादी साबुदाणा खिचडी, थालीपीठ, राजगिरा लाडू या पलीकडे सहसा जात नाही. या सर्वांपेक्षा वेगळ्या असलेल्या वरीच्या तांदळाची खांडवीची रेसिपी आपण ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी पाहणार आहोत.   
...................

उपवास असेल तर त्या दिवशी उपवासाचे आणि नेहमीचे असे दोन प्रकारचे पदार्थ करावे लागतात. असे करणे फारच घाई-गडबडीचे होते. त्यामुळे नोकरी करणाऱ्या स्त्रियांची तर फारच धांदल उडते. अशा वेळी मुलांच्या डब्याला उपवासाचा एखादा पदार्थ दिल्यास सकाळच्या धावपळीतून थोडी सुटका मिळते. सर्वसाधारणतः उपवासाच्या पदार्थांची यादी साबुदाणा खिचडी, थालीपीठ, राजगिरा लाडू या पलीकडे जात नाही. म्हणूनच या सर्वांपेक्षा वेगळ्या असलेल्या वरीच्या तांदळाच्या खांडवीची रेसिपी आपण या वेळी पाहणार आहोत.   

वरीचे तांदूळवरीचे तांदूळ पचायला हलके असतात. शिवाय तो कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. शिवाय हा पदार्थ करायला सोपा आणि आवडण्यासारखा आहे. त्यामुळे तो नक्की करून पाहा. या पदार्थामधून भरपूर कॅल्शियम, लोह, प्रथिने इत्यादी घटक शरीराला मिळतील.    

साहित्य :
वरीचे तांदूळ - एक वाटी, खोवलेले खोबरे - अर्धी वाटी, साखर - एक वाटी, सुका मेवा - आवडीनुसार, वेलदोडे - दोन, साजूक तूप - तीन चमचे  


कृती : 
- सर्वप्रथम वरीचे तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. 
- दोन चमचे साजूक तुपात हे तांदूळ छान परतून घ्या. 
- त्यात गरम पाणी घालून ते मोकळेच शिजवून घ्या. झाकण ठेवू नका.  
- नंतर त्यात साखर घालून नीट मिसळून घ्या व थोडे गरम करा. 
 - हे मिश्रण व्यवस्थित मिसळल्यानंतर त्यात खोबरे घालून परत हलवा.
- एकसारखे मिश्रण तयार झाल्यावर त्यात वेलदोडे घाला.
- एका ताटाला तूप लावून या मिश्रणाच्या वड्या थापा.   
- वरून सुका मेवा व थोडे ओले खोबरे घालून सजावट करा. या वड्या चौकोनी किंवा आडव्या आकारात कापून घ्या.
- या वड्या श्रीखंडाच्या किंवा खांडवीच्या वड्यांप्रमाणे घट्ट नसतात. थोड्या मऊ असतात; पण त्यांना आकार देता येऊ शकतो. 

- आश्लेषा भागवत
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZJUCI
Similar Posts
पंचामृत केक ‘ पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी ’ या सदरात आज पंचामृत केक...
वरी मका खिचडी ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात आज वरी मका खिचडी...
भाज्यांचे रोल्स विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. परंतु पोळीसोबत भाजी मुलांच्या गळी उतरवणं एक अवघड काम आहे. अशा वेळी या भाज्या मुले खातील याप्रमाणे वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याकडे आईचा कल असतो. अशाच एका विविध भाज्या असलेल्या पदार्थाची रेसिपी आपण या वेळी पाहणार आहोत.... तो पदार्थ म्हणजे भाज्यांचे रोल्स
स्टीम्ड पालक वडी भरपूर पौष्टिक घटक असलेल्या पालकाची भाजी मुले खात नाहीत. याचे पराठेही मुलांना फारसे आवडत नाहीत. म्हणून मग पालकाचा एक नवीन पदार्थ खास मुलांसाठी होऊ शकतो, जो ते आवडीने खातील. आज आपण पाहू या स्टीम्ड पालक वडीची रेसिपी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language